राज्यतील लॉकडाउन 31 डिसेंबरपर्यंत कायम; ठाकरे सरकारचा निर्णय!

राज्यतील लॉकडाउन 31 डिसेंबरपर्यंत कायम; ठाकरे सरकारचा निर्णय!

राज्यात मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

तसेच दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे करोना प्रतिबंधित क्षेत्रात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

सरकारने म्हटलं आहे,

आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाउन करण्यासाठी राज्यांना केंद्राची संमती घेणं आवश्यक आहे.

यासंदर्भातली सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारीच दिली होती. केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना अर्थात गाईडलाइन्सही देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाउन असणार आहे.

कोरोना कंन्टेन्मेंट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

त्यामुळे 2020 या वर्षात लॉकडाउन संपेल का या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. लॉकडाउन संपायला आता पुढचं वर्ष उजाडेल यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here