राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नुतनीकरण व सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्याबाबत बैठक संपन्न

519

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे
नुतनीकरण व सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्याबाबत बैठक संपन्न

कोल्हापूर दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नुतनीकरण व सुशोभीकरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 8 कोटी 28 लाखाचा निधी मंजूर करण्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये आज दूरदृष्यप्रणालीव्दारे बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी तात्काळ निधी मंजूर करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
बैठकीस पालकमंत्री सतेज पाटील, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, समाज कल्याण विभागाचे पुण्याचे प्रादेशिक उपआयुक्त, कोल्हापूरचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.
या निधीमधून शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नुतनीकरण व त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित कलादालनाची निर्मिती करणे, समाधी स्थळाला संरक्षक भिंत बांधणे, पादचारी मार्ग करणे, लॅण्डस्केपींग करणे, स्वच्छतागृह सुविधा करणे, वाहनतळाची सुविधा करणे, या परिसरामध्ये असणाऱ्या ऐतिहासिक समाधी वास्तुचे संवर्धन, दुरुस्ती व डागडूजी करणे, विद्युतीकरण करणे ही कामे करण्यात येणार आहेत, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here