राजणी शिवारात दिवसा वाघाचा मुक्त संचार ;वन विभागाकडून मात्र खंडन;

*राजणी शिवारात दिवसा वाघाचा मुक्त संचार*

_वन विभागाकडून मात्र खंडन__शेतकऱ्यांकडून पिंजरा लावण्याची मागणी_

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील राजनी शिवारात एका वाघाने गेल्या पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, सकाळ, दुपार, संध्याकाळ वाघ शेतातील वाडयावर येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या शेत वाड्यावर आजूबाजूचे सर्व लोक सतर्क असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्याने आवाज करून वाघाला पळवून लावत आहे.▪️यासंदर्भात वनविभागाला अनेकवेळा दूरध्वनीवरून माहिती देऊनही वनविभाग या घटनेकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या या परिसरामध्ये शेतीची कामे जोरात चालू असल्यामुळे व शेतात काम केल्याशिवाय मजुरांना पर्याय नाही; परंतु शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.▪️विशेष म्हणजे शेतातील कामे चालू झाली आहे. राजनी शिवारातील शेताच्या कामासाठी महीला मजूर जात आहे. मात्र वाघाचे वारंवार दर्शन होत असल्यामुळे परिसरात मजूर जाण्यास घाबरत आहे .शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कधीही हल्ला करू शकते परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले डोगर नदीचा परिसर असून, राजनी शिवारात मोठ्या प्रमाणावर मका शेती आहे. त्यामुळे वाघाला लपण्यासाठी जागा उपलब्ध आहे. परिसरात वाघाचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वनविभागाने या भागात पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे. वाघाचा मुक्त संचार बाबत वनविभागाला वारंवार सूचना देऊनही या वाघाची दखल घेतली जात नाही. ▪️राजणी शिवारात शेतातील एका व्यक्तीनं वाघाचा हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियातून गावात प्रसार झाला आहे. एक वाघाचा रस्त्यावरचा असा मुक्त संचार फारच कमी लोकांनी यापूर्वी पाहिला असेल. पण या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here