असीम सरोदेपीस फाऊंडेशन आयोजितईडी चे वादळ या विषयावर चर्चासत्रात ईडीचे यश-अपयशावर विचारमंथनअहमदनगर(प्रतिनिधी)- अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केंद्र सरकार विरोधकांना शरणागती पत्करण्यासाठी शस्त्र म्हणून वापरत आहे. 2014 नंतर मोठ्या प्रमाणात सुड घेण्याच्या भावनेने कारवाया करण्यात आल्या. शरणागती पत्करा किंवा भाजपमध्ये प्रवेश करा, या पध्दतीने ईडीच्या मदतीने राजकारण केले जात आहे. ईडीच्या द्वारे कारवाया अनेक पण मोजक्यांना शिक्षा झाल्याची आकडेवारी मांडत ईडीने केलेल्या बहुतेक कारवाया संशायाच्या भोवर्यात असल्याचे प्रतिपादन अॅड. असीम सरोदे यांनी केले.पीस फाऊंडेशनच्या वतीने सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे ईडी चे वादळ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना अॅड. सरोदे बोलत होते. यावेळी अशोक सब्बन, अॅड. सुभाष लांडे, संजय झिंजे, अन्सार सय्यद, प्रा. बापू चंदनशिवे, अॅड. रविंद्र शितोळे आदी उपस्थित होते.पुढे अॅड. सरोदे म्हणाले की, कुणालाच भ्रष्टाचारी लोकांबद्दल सहानुभूती असण्याची गरज नाही, प्रत्येक भ्रष्टाचारी व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. पण कायद्याची प्रक्रिया पाळून कारवाया व्हाव्यात, ही कायदेशीर अपेक्षा अनेक नागरिकांनी करावी. अशी स्पष्टता मनात व डोक्यात निर्माण होण्याची गरज आहे. ईडीच्या कारवाईने एखाद्या व्यक्तीचे राजकीय व सामाजिक जीवन उध्दवस्त करणे, त्या व्यक्तीविरोधात लोकांमध्ये संशय निर्माण करण्याचे काम होत आहे. राजकीय कारणासाठी ईडीचा या केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याने लोकशाहीची प्रकृती बिघडणार आहे. ईडीचे यश-अपयश नागरिकांनी ओळखण्याची गरज असून, नागरिकांना यंत्रणेला जाब विचारण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे मनी लॉन्ड्रिंग दाखवून ईडी स्वतःच्या हातात कारवाई घेते, तेव्हा त्यात बेकायदेशीरता असते असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. तर ईडीच्या पीएमएलए कायद्यांतर्गत 2014 नंतर कारवाईचा विस्फोट झाला. राजकीय कारणासाठी सत्ताधार्यांनी त्याचा विपर्यास करुन कायद्याचा संघटित गुन्हेगारी पद्धतीने वापर केला जात आहे. मनी लॉन्ड्रिंग कारवाई अंतर्गत 2014 ते 2018 या वर्षात ईडीने 347 कारवाया केल्या. यामध्ये 130 जणांना अटक करण्यात आली. तर फक्त 9 जण यामध्ये दोषी आढळले. तर 2005 ते 2014 पर्यंत या कारवाईची आकडेवारी अवघे 104 केसेस होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये दोषी आढळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भाजप हा राजकीय कोंडवाडा बनला आहे. मस्तवाल झालेल्या राजकीय आर्थिक भ्रष्टाचार केलेल्या पुढार्यांच्या मागे ईडी लाऊन व त्यांना भाजप मध्ये घेऊन स्वच्छ करण्याचा प्रयोग भाजपसाठीच भविष्यात आत्मघातकी ठरण्याची शक्यता असल्याचेही अॅड. सरोदे म्हणाले. इतिहासात अभूतपूर्व घटना की, केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनामुळे तीन कायदे मागे घेण्याची वेळ आली आहे. हा सर्वसामान्य शेतकर्यांच्या लढ्याचा विजय आहे. सर्वच राजकीय पक्षात भ्रष्टाचारी पुढारी असल्याने हतबल झालेले पक्ष सामान्य माणसांच्या अनेक प्रश्नांवर लढाई करण्यास तयार नाहीत. जनतेने गप्प न राहता कायद्याची पायमल्ली करणार्या विरोधात आवाज उठविण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविकात पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष अर्शद शेख यांनी राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी ईडी यंत्रणा हाताळली जात आहे. विरोधी पक्षच नसावा अशी धारणा सत्ताधार्यांची झाली आहे. आमच्यात येऊन पवित्र व्हा, अन्यथा जेलमध्ये जा! हा पवित्रा सत्ताधारी घेत आहे. देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी अभिनेत्री कंगना रनोट, हिंदू-मुस्लिम दंगे या बातम्या पेरल्या जात आहे. तर सत्ताधारी हुकुमशाही पध्दतीने जनतेचे शोषण करत आहे. नागरिकांना जागृक करण्यासाठी पीस फाऊंडेशन विविध विषयावर चर्चासत्र घेत असून, हा चौथा चर्चासत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अहमदनर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी येथील अॅड.अनिल सरोदे निवडून आल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कॉ.महेबुब सय्यद यांनी केले.मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….पीस फाऊंडेशनच्या वतीने सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे आयोजित ईडीचे वादळ या विषयावर चर्चासत्रात मार्गदर्शन करताना अॅड. असीम सरोदे यावेळी पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष अर्शद शेख, प्रा. कॉ.महेबुब सय्यद, अशोक सब्बन, अॅड. सुभाष लांडे, संजय झिंजे, अन्सार सय्यद, प्रा. बापू चंदनशिवे, अॅड. रविंद्र शितोळे आदी उपस्थित होते. (छाया-वाजिद शेख-नगर)