{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
याबाबत सविस्तर वृत्त असे की भा. ज. पा. माजी जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. अरुण मुंढे व त्यांचे बंधू श्री उदय मुंढे यांच्या विरुद्ध दि. २४/११/२०२३ रोजी जो वाळू चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला त्याच्या विरुद्ध शेवगाव पाथर्डी येथील संतप्त नागरिकांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन सदरचा खोटा गुन्हा रद्द करणेबाबद विनंती केलेली होती तसेच तीव्र आंदोलनाचा व रास्ता रोकोचा इशारा प्रशासनाला दिला होता. सदर निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आजरोजी दि. ०४/१२/२०२३ रोजी स्व. गोपीनाथ मुंढे साहेब चौक ते क्रांती चौक भव्य असा मोर्चा काढण्यात आला व रास्ता रोको करण्यात आला त्या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेवगाव पाथर्डी मतदार संघातून नागरिक उपस्थित होते . आंदोलनासाठी आलेल्या वक्त्यांनी भाषणे केली व भ्रष्ट पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या निलंबणाची व सरपंच पिंगेवादी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणेबाबद तसेच खोटा गुन्हा रद्द करणेबाबद मागणी केली. मा. अरुण मुंढे यांनी सदर खोट्या गुन्ह्याबाबद सत्य जनतेसमोर मांडले. भाषणात बोलताना अरुण म्हटले कि फिर्यादी मंडळाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात असे स्पष्ट म्हटले आहे कि सदरचा खोटा गुन्हा पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दबाव टाकून व धमकी देऊन बळजबरीने दाखल करायला लावला आहे. तसेच मा. अरुण मुंढे यांनी विलास पुजारी यांनी शेवगाव शहरात कसा निर्दोष जनतेवर अन्याय केला त्याबाबद चे सत्य जनतेसमोर मांडले. अशी परिस्थिती असताना अरुण यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण करण्याच्या हेतूने सदरचे षडयंत्र रचलेले आहे. *यावेळेस प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली यामध्ये, प्रा. किसन चव्हाण सर, गोकुळ दौंड, बाळासाहेब सोनावणे, तुषार वैद्य, संजय टाकळकर, गुरुनाथ मळवाडे, विलास फाटके, सुनील काकडे सर, वजीर पठाण, गणेश कराड, प्यारेलाल शेख आदी वक्त्यांनी भाषणे केली, त्यावेळी उपस्थित नगरसेवक कमलेश गांधी, अजय भारस्कर, दिगंबर काथ वटे, विकास फलके, विनोद मोहिते, कैलास तिजोरे, अंकुश कुसळकर व अमोल सागडे, अंबादास ढाकणे, सचिन म्हस्के, बाळासाहेब कोळगे मतदार संघातून अरुण मुंढे समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते. रास्ता रोको व आंदोलनासाठी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व नागरिकांचे अरुण मुंढे यांनी आभार मानले.
ताजा कालम
आमदारांवर डागली आरोपांची तोफ तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांची प्रशासनावर नसलेली पकड त्यांच्या ठराविक कोंडाळ्यात बिझी असलेल्या आमदार त्यांच्या अवतीभवती असलेले कॉन्ट्रॅक्टर आणि नारळ कणीस च्या एकनिष्ठ कार्यकर्ते करतात लोकप्रतिनिधीना मीस गाईड विद्यमान आमदारांनी साधा फोन करून सुद्धा केली नाही चौकशीमी त्यांना निवडून दिले त्याचा त्यांना विसर पडला श्री. अरुण मुंडे यांची आमदारकीची तर तयारी नाही ना??? सर्वसामान्य शेवगावकरांना पडला प्रश्न
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार