बाराबाभळी येथील बादशाही मुल्ला मस्जिद ट्रस्टच्या जागेवर दवाखान्याचा बनाव करून सदर जागेवर हॉस्पिटल विचाराधीन आहे असे म्हणून पैसे लाटणारयांवर कारवाई करण्याची मागणी.
रहेबर सोशल फाऊंडेशनच्या बँक अकाउंट उघडून पैसे लाटणारयांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश -अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिगार दाने गल्ली येथील बादशाही मुल्ला मस्जिद ट्रस्ट च्या विनापरवानगी ने मस्जिद च्या जागेमध्ये हॉस्पिटल बनविणार असे व्हाट्सअप वर मेसेज टाकून पैसे गोळा केले आहे तरी ताबडतोब बँकेचे खाते सील करून संबंधित रहेबर सोशल फाउंडेशन च्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना मुंबई येथे शिष्टमंडळ जाऊन भेटले यावेळी बादशाही मुल्ला मस्जिद ट्रस्टचे चेअरमन आसिफ शेख, सेक्रेटरी मतीन सय्यद, ट्रस्टी शफात शेख, वसीम शेख, निसार शेख आदी उपस्थित होते.
भिंगार दाणे गल्ली येथील बादशाही मुल्ला मज्जिद ट्रस्ट यांच्या मालकीची जागेमध्ये दहा एकर जागा रहेबर सोशल फाउंडेशन यांनी मागणी केली आहे सदर ट्रस्टने 2020 मध्ये मान्यता घेतली असून सदरील ट्रस्टवर आमचा कोणत्याही प्रकारे विश्वास नाही कारण त्यांनी आपली व वक्त बोर्डाची किंवा ट्रस्टची कोणतीही मान्यता न घेता बादशाही मुल्ला मज्जित ट्रस्टच्या बाराबाभळी येथील जागेवर अल्पसंख्यांक समाजासाठी हॉस्पिटल उभारणार आहे असे विचाराधीन आहे असे मेसेज टाकले आहे व त्यासाठी संबंधितांनी महाराष्ट्र बँक शाखा भिंगार अहमदनगर येथे बँकेत खाता उडून बादशाही मुल्ला मस्जिद च्या 10 एकर जागेवर आम्ही हॉस्पिटल बनविणार असे व्हाट्सअप मेसेज टाकून पैसे गोळा केले आहे तरी ताबडतोब ते खाते सील करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावे तसेच ती जागा देण्यास वक्त बोर्डाने सुद्धा नकार दिल्यामुळे त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आलेला आहे तरी सदरील रहेबर सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी दागड व गुंड प्रवृत्तीचे असून सदरील लोकांपासून मस्जिदच्या ट्रस्टींच्या जीवितास भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर सदरील व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.




