रस्त्याने पायी जाणारे महिलेस हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारा आरोपी जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

929

रस्त्याने पायी जाणारे महिलेस हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारा आरोपी जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

रस्त्याने पायी जाणारे महिलेस हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारा आरोपी जेरबंद,

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

दिनांक ०६/०८/२०२१ रोजी सायंकाळचे वेळी फिर्यादी सुमिता दिनेश जाधव, वय २९ वर्ष, रा. म्हसे खुर्द, ता. पारनेर ह्या गावातून जाधववाडी रस्त्याने एकट्याच पायी घरी जात असताना पाठीमागून मोटार सायकलवरून आलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचे सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफूले व दोन मोबाईल असा एकूण १९,०००/- रु. किं. चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत पारनेर पोलीस ठाणे येथे गुरनं. ५६९/२०२१ भादवि कलम ३९२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे आदेशाने श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने समांतर तपास करीत असताना पोनि/ अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा किरण मेहेत्रे, रा. जामखेड याने केला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना/ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, पोकॉ/ रणजित जाधव, जालिंदर माने, चालक पोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून जामखेड येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घेवून व शोध घेवून आरोपी नामे किरण अरुण मेहेत्रे, वय- २७ वर्षे, रा. सदाफूले वस्ती, जामखेड, ता. जामखेड यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ५,०००/-रु. किं. चा विवो कंपणीचा मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह पारनेर पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पारनेर पो.स्टे. करीत आहेत. आरोपी किरण अरुण मेहेत्रे हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापूर्वी दरोडा, दरोड्याची तयारी, अपहार

अशा स्वरुपाचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल

१) रेणापूर पो.स्टे. लातूर गुरनं.

२) किनगाव पो.स्टे. गुरनं.

३) बारामती शहर पो.स्टे. गुरनं.

४) पनवेल पो.स्टे. गुरनं.

आहेत. ११४/२०१६

५१/२०१६,

भादवि कलम ३९५

भादवि कलम ३९५

भादवि कलम ३९९,४०२

१८३/२०१३, ४१८/२०१० भादवि कलम ४०६, ३४

५) सेन्ट्रल पो.स्टे. कल्याण गुरनं. ४८९/२०१९ भादवि कलम ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट कलम ६) सेन्ट्रल पो.स्टे. कल्याण गुरनं. ३१०/२०१९, भादवि कलम ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट कलम ३/२५

३/२५

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलवार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here