- बॉलिवूडमधील झगमगत्या विश्वात नात्यांची वेगवेगळी रुपे पाहायला मिळतात. मात्र, ही नाती वरुन जितकी सरळ दिसतात, तितकी त्यात गुंतागुंत असते. विवाहबाह्य संबंध, एकापेक्षा जास्त लग्ने, लग्नापूर्वीची अनेक अफेअर्स, असं सार काही बॉलिवूडमध्ये पाहण्यास मिळतं..
- बॉलिवूडमधील काही प्रमुख सेलिब्रिटींच्या अफेअर्सची नेहमीच चर्चा होत असते. त्यापैकी एक जोडी म्हणजे, बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नि अभिनेत्री रविना टंडन..! हे दोघेही आता आपआपल्या संसारात रमले असले, तरी कधी काळी त्यांच्या गाजलेल्या अफेयरची आजही चर्चा होते.. खरं तर अक्षयचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. त्यात रविनासह शिल्पा शेट्टी, रेखा यांच्यासोबत त्याचे अफेयर असल्याचा गाजावाजा झाला
- बाॅलिवुडमध्ये अक्षय कुमारने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. वैयक्तीक आयष्यातही तो एक आदर्श पती आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासोबत त्याचा सुखी संसार सुरु आहे. मात्र, ट्विंकलसोबत लग्नगाठ बांधण्याआधी त्याने रवीना टंडनसोबत सात फेरे घेण्याचा निर्णय घेतला होता.
- ‘मोहरा’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अक्षय-रवीना यांच्यात जवळीक वाढली होती. त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. त्यामुळे अक्षय-रवीनाच्या कारकिर्दीला नवी उंची मिळाली. त्याच वेळी त्यांच्यातील अफेयरच्या चर्चा माध्यमातून समोर येत होत्या. अक्षय व रवीनाने गुपचूप एका मंदिरात लग्न केल्याचीही अफवा पसरली होत
- रवीना काय म्हणाली..?
- दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका ‘चॅट शो’मध्ये खुद्द रवीनाने या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. ती म्हणाली, की “आम्ही दोघांनी एक विचार करुन निर्णय घेतला होता. ओळखीच्या व्यक्तीशी माझा साखरपुडा झाला होता. मला अगदी सामान्य जीवन जगायचे होते. मी लग्नाआधीच काम सोडण्याचा निर्णय घेतला होता.”
- “आम्हाला वाटले होते, की माझा शेवटचा शूटचा दिवस असेल, तेव्हा आम्ही लग्न करू. आमचा साखरपुडा मोठ्या जल्लोषात झाला होता. त्यावेळी पंडित होते, पूजा झाली. त्याचे व माझे कुटुंब दिल्लीहून आले होते. त्याच्या घरातील मोठ्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर लाल दुपट्टा ठेवला होता. सगळ्यांना आम्ही लग्न केलं, असं वाटलं…!”
- दरम्यान, 1998 मध्ये अचानक रवीना व अक्षय विभक्त झाले. त्यावर ती म्हणाली, की “मी माझ्या करिअरला पुन्हा सुरुवात केली असता, तो पुन्हा म्हणाला की ते सोड आणि आपण लग्न करू या… पण, नंतर मी त्याला सांगितले, की एकदा मी माझ्या करिअरला न निवडता तुला निवडले होते, पण आता मी तुला नाही, तर करिअरला निवडेन..!
- अक्षयने मात्र कधीच त्याच्या व रवीनाच्या साखरपुड्याबाबत वक्तव्य केलेले नव्हतं, पण एका मुलाखतीत तो म्हणाला होता, की “आमचा फक्त साखरपुडा झाला होता, जो नंतर तुटला, पण आमचं लग्न झालं नव्हतं..!”
- या व्यक्तीमुळे ब्रेकअप
- 1996 मध्ये अक्षय कुमारचा ‘खिलाडीयों का खिलाडी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यावेळी अक्षय व रेखा यांच्यातील अफेयरची चर्चा रंगली होती. अक्षयची रेखाकडे वाढती जवळीक पाहून रवीनाला मोठा धक्का बसला होता. त्याच्यावर काडीमात्र भरवसा नसल्याचे सांगून रवीनाने अक्षयच्या आयुष्यातून जाणेच पसंत केले.