यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य – केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

    811

    ✍️ यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य – केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

    ❗ यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

    ? करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकण्यात आली होती.

    ⏳ आता परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं असून, 4 ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

    ?️ परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयानं करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याचे आदेश आयोगाला दिले. या याचिकेवर आता बुधवारी अर्थात 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here