यूटय़ुबवर एटीएम मशीन फोडण्याचा व्हिडीओ बघून त्यानुसार मुलुंड परिसरातील इंडीयन बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न एका टोळीने केला. पण त्यात यश न आल्याने त्यांनी पळ काढला.
आपण गेलो म्हणजे सुटलो अशा हवेत आरोपी होते. परंतु मुलुंड पोलिसांनी अवघ्या 12 तासांत त्या पाच आरोपींना गजाआड केले.*
मुलुंड पश्चिमेकडे मलबार हिल रोडवर इंडियन बँकेचे एटीएम सेंटर आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही आरोपींनी पद्धतशीर प्लान करून ते एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही आणि आरोपींनी खाली हात तेथून पळ काढला.
याबाबत माहिती मिळताच उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलूंड पोलीस ठाण्याचे एपीआय संतोष कांबळे, नितीन पाटील, धनाजी कदम, अनिल पवार या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. आरोपींनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीदेखील जाळले होते.
मात्र तरीसुद्धा संतोष कांबळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करून चार जणांना पकडले.






