अहमदनगर नोव्हेंबर २०२० :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पोटात तीव्र वेदना झाल्याच्या तक्रारीनंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंडे (वय 45) यांनी स्वत: मंगळवारी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ते म्हणाले की त्यांची तब्येत स्थिर आहे.
तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.





