- अभिनेते नसीरुद्दीन शाह नेहमी आपले परखड मत मांडताना दिसतात.
- काही जहाल मतवादी विचारांच्या धार्मिक संघटनांनी मुस्लिम व्यक्तींची हत्या करण्याची धमकी दिली. त्यावरुन भडकलेल्या नसिरुद्दीन शाह यांनी आपली भूमिका मांडली आहे. नसिरुद्दीन शाह म्हणाले, “मला तर आता लोकांवर विश्वासच राहिलेला नाही. काही करुन वातावरण दुषित कसे होईल याचाच विचार सतत केला जातो.”
- गेल्या काही दिवसांपासून नसिरुद्दीन शाह हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.
- काही जहाल मतवादी विचारांच्या धार्मिक संघटनांनी मुस्लिम व्यक्तींची हत्या करण्याची धमकी दिली. त्यावरुन भडकलेल्या नसिरुद्दीन शाह यांनी आपली भूमिका मांडली आहे. नसिरुद्दीन शाह म्हणाले, “मला तर आता लोकांवर विश्वासच राहिलेला नाही. काही करुन वातावरण दुषित कसे होईल याचाच विचार सतत केला जातो.”
- “आता हे सांगावं लागेल या देशामध्ये सध्या वीस कोटी मुस्लिम आहेत. आम्ही सगळे भारतीय आहोत. जर कोणी आम्हाला विनाकारण त्रास देत असल्यास अशावेळी फार जपून वागण्याची गरज असते. माथेफिरु आपल्याला भडकवात. अशावेळी संयम महत्वाचा आहे. आम्हीही या देशाचे आहोत हे ऐकुनही आम्हाला विनाकारण त्रास देत असल्यास आम्हीही त्यांचा लढून सामना करु,” असं नसिरुद्दीन शाह यांनी यावेळी सांगितले.