‘या’ खाद्यपदार्थांसोबत औषधे घेणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल हानीकारक..!

421

आजारी व्यक्तीला प्रत्येक डॉक्टर पथ्यपाणी सांभाळण्याचा सल्ला देतात. औषधोपचार घेताना काय खावे, काय प्यावे, याबाबत मार्गदर्शन करीत असतात. कारण, रुग्णाने खाल्लेल्या अन्नपदार्थांचा औषधांवरही परिणाम होत असतो. आजारी व्यक्तीने औषधोपचार घेताना खाण्या-पिण्याची काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या… *चहा-कॉफी*उष्ण पेयांमुळे काही औषधे खराब होतात. त्यामुळे चहा – कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्थांसोबत औषधे घेऊ नयेत. थंड पाण्यासोबतच औषधे घ्यावीत. *केळी*केळी आरोग्यासाठी चांगली असली, तरी हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी केळीसह पोटॅशियम असणाऱ्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये. त्याचे सेवन केल्यास हृदयाचे ठोके वाढू शकतात. *दुग्धजन्य पदार्थ*अँटीबायोटिक्स औषधांवर दूध, चीज, लोणी, आंबट मलई असलेले दुग्धजन्य पदार्थ परिणाम करतात. दुधातील कॅल्शियम, मॅग्नेशियम सारख्या प्रथिनांमुळे काही औषधांची क्षमता कमी होते. *दारु*चुकूनही दारु पिल्यावर औषधे घेऊ नका. अल्कोहोलमुळे औषधांवर हानिकारक प्रक्रिया होऊ शकते. अशा वेळी औषधांचा फायदा तर होणार नाही, उलट एखादं वेळी ते जिवावरही बेतू शकते. *कोल्ड ड्रिंक, सोडा*सोडा आणि कोल्ड्रिंकसह औषधे घेऊ नका. अशा वेळी औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात..*टीप – औषधे घेण्यापूर्वी डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here