
जेऊर बायजाबाई येथील घटना; ९ जणांना अटक
नगर नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई या गावात ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवात रविवारी (दि.७) रात्री दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीमध्ये झाले. या दगडफेकीमध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. तर अनेक जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा जेऊर गावात दाखल झाल्याने दंगल आटोक्यात आली. या प्रकरणी १५० जणांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्रभरात ९ जणांना अटक केली आहे.
जेऊर येथे यात्रोत्सवात तैनात केलेला पोलिस बंदोबस्त.
नगर जिल्ह्यामध्ये सध्या यात्रेचा हंगाम सर्वत्र सुरू आहे आणि ठिकठिकाणी यात्रा व जत्रा असल्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे नगर तालुक्यातील जेऊर येथे गेल्या ३ दिवसांपासून ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सव सुरु होता. रविवारी यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने महिला, लहान मुले व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रहाटगाडग्याजवळ पाळण्यात बसण्यावरून २ समाजाच्या मुलांमध्ये रात्री आठच्या सुमारास शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वाद वाढून दोन्ही गटाकडून दगडफेक सुरु करण्यात आली.
यात्रेतील खेळण्याची दुकाने तसेच यात्रेत जमलेल्या नागरिक, महिला यांच्यावर सुमारे अर्धा तास दगडफेक सुरू होती. अचानक दगडफेक सुरू झाल्याने यात्रेत सर्वत्र पळापळ सुरू झाली. यामध्ये खेळण्याचे दुकानदार असलेल्या महिला व लहान मुले जखमी झाले. तसेच काही ग्रामस्थांनाही दगड लागल्याने जखमी झाले आहेत. एकूण दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गोरख बनकर
यांना डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात्रेत झालेल्या दगडफेकीने अनेक महिला तसेच लहान बालके यात्रेतच अडकून पडले होते तर अनेक लहान मुले पालकांपासून बाजूला जात यात्रेतील गोंधळात हरविल्याने लहान मुले व त्यांचे आई वडीलही आक्रोश करत होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ध्वनिक्षेपकावरून शांतता राखण्याचे आवाहन
करण्यात येत होते. परंतु परिस्थिती खूप भयानक व भितीदायक बनली होती. सर्वत्र नागरिक सैरावैरा धावत होते. एका गटाकडून सुमारे १०० ते २०० लोकांचा घोळका अंधारातून यात्रेकरूंवर दगडफेक करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
गटात दगडफेक झाल्यानंतर गावात उपअधीक्षक अजित पाटील, भिंगार कम्पचे स. पो. नि. दिनकर मुंडे, नगर
जेऊरगावात बाजारपेठेत दगडांचा मोठा खच पडला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह मोठा फौजफाटा जेऊर गावात दाखल झाला. त्या पाठोपाठ जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, पोलिस तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख हे ही पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे गेल्यावर दगडफेक करणारे पसार झाले रात्री उशिरापर्यंत गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे वातावरण निवळले. जेऊर गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच ही दंगल झाली असून या ठिकाणीही किरकोळ आणि वैयक्तिक वादाला जातीय दंगलीचे स्वरूप देण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे..
पोलिसच झाले फिर्यादी
या दगडफेक प्रकरणी पोलिसच फिर्यादी झाले असून पो. ना. दीपक गांगर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इद्रीस मुनीर शेख, मन्नू अलीम कुरेशी, अजीज रफिक शेख, हर्षद बागवान, साहिल बागवान, मुनीर खैरू शेख, शेख मुस्ताक, युनूस शेख, मुसा शेख, फइस रफिक शेख, अतुल उर्फ सोमनाथ सुखदेव तवले, सुनील दारकुंडे, गणेश दारकुंडे, दीपक शिंदे यांच्यासह इतर १०० ते १५० जण (सर्व रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर) यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३, ३३६,३३२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३,३ २४. व क्रिमिनल मेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इतर आरोपीचा शोध सुरु आहे.
