यतीमखान्यातील हरविलेले तीन मुले सुखरुप
    मिळाले

    311

    अहमदनगर येथील यतीमखाना ॲण्ड बोर्डींग संस्थेतील तीन मुले भोजनसाठी न आल्याने
    शोध घेउन आढळून न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आले होते. अखेर ते मुले नातेवाईकांकडे
    मिळून आल्याची माहिती संस्थेचे अधीक्षक शेख गुफरान रफिक यांनी दिली.
    अहमदनगर यतीमखाना अॅण्ड बोर्डींग या संस्थेतील विदयार्थी शेख मोईन वसीम, शेख
    आयान सादिक, शेख रेहान वसीम हि तिन्ही मुले दि. ०४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता
    भोजना साठी इतर मुलांबरोबर दिसुन न आल्यामुळे संस्थेतील कर्मचारी यांनी त्याचा शोध घेतला
    असता आढळून न आल्यामुळे त्यांच्या पालकांशी संपर्क करुन हि मुले घरी आले आहे का याची
    माहिती घेतली असता ते घरी परत आले नसल्यामुळे अखेर संस्थेचे अधीक्षक शेख यांनी कोतवाली
    पोलीस स्टेशन येथे मुले हरविल्या बाबत गुन्हा दाखल केला होता. परंतु सदर मुलांचे शोध
    घेण्यासाठी पालकांच्या मदतीने संस्थेचे कर्मचारी यांनी शोध घेतला असता हि तिन्ही मुले
    नातेवाईकांकडे सुखरुप मिळुन आलेली आहे.
    मुले हरविले बाबत वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द झाल्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण
    निर्माण झाले होते संस्थेव्दारे मुलांचे सुरक्षतेची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. असे प्रसिध्दी
    पत्रकाव्दारे शेख यांनी कळविले आहे.
    आपल्या लोकप्रिय दैनिक मध्ये वरील खुलासा प्रसिध्दी करून सहकार्य करण्यात यावे हि नम्र
    विनंती
    आपला विश्वासू
    Shaikh GR
    (शेख गुफरान रफिक)
    अधीक्षक
    अहमदनगर यतीमखाना अॅण्ड बोर्डींग
    अहमदनगर.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here