
कमिटीचा स्तृत्य उपक्रम दि.२८ सप्टेंबर ऐवजी दि.१ ऑक्टोबर ला साजरे करणार ईद मिलादुन्नबी झेंडा जुलुस मिरवणूक

अहमदनगर : राज्यातील विविध शहरात यंदाच्या वर्षी दि.२८ सप्टेंबर २०२३ रोजी तिथी / कॅलेंडर नुसार एकत्र आलेल्या हिंदू धर्मिय गणपती विसर्जन मिरवणूक व मुस्लिम धर्मिय ईद मिलादुन्नबी निमित्ताने जुलुस मिरवणूक मुळे शहरातील वातावरण तापत असताना तसेच आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, कोणीही दुसरा या एकत्र आलेल्या उत्सवाचा गैरफायदा घेऊ नये यासाठी काळजीपूर्वक योग्य विचार करून, व दोन्ही उत्सव शांततेत उत्साहाच्या वातावरणात साजरे व्हावेत म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्य शहर मुंबई, पुणे पाठोपाठ अहमदनगर शहरात ही ईद मिलादुन्नबी निमित्ताने निघणाऱ्या झेंडा मिरवणूक दि.२८ सप्टेंबर २०२३ ऐवजी दोन दिवस पुढे म्हणजेच दि.१ ऑक्टोबर २०२३ ला साजरे करण्याचा अहमदनगर येथील ईद मिलादुन्नबी कमिटीने घेतलेला निर्णय दोन्ही समाजांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असुन हिंदू मुस्लिम अमन, भाईचारा वाढवणारा, राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा जोपासणारा असल्याचे, फक्त आपला विचार न करता आपले पेक्षा इतरांचा विचार ही भावना महत्त्वाची असुन या कृत्यामुळे तख्ती दरवाजा ईद मिलादुन्नबी कमिटीचे आदर मान आणखीन वाढलेला असुन कमिटीचे व कमिटी प्रमुख पदाधिकारी यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.
राज्यात सद्या सर्वत्र वातावरण संवेदनशील असतांना, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांचे वर अतिरिक्त तणावाचे प्रसंग जाणवत असताना, आगामी निवडणुका या सर्व गोष्टींचा विचार करून ईद मिलादुन्नबी कमिटीने एकत्र आलेल्या हिंदू धर्मिय गणपती विसर्जन मिरवणूक व मुस्लिम धर्मिय ईद मिलादुन्नबी निमित्ताने जुलुस मिरवणूक दोन दिवस पुढे करून खऱ्या अर्थाने सामंजस्याची भुमिका पार पडली असल्याचे व यामुळे तुम्ही कमकुवत न ठरता सर्वांची मने जिंकली असल्याचे गौरवोद्गार जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष सेठ गुंदेचा यांनी काढलेत.
हजरत मोहम्मद पैगंबर यांचे समस्त मानव जातीला अमन, शांती, भाईचारा, श्रध्दा, सबुरी चा जो महान संदेश आहे त्याचे आचरण करत व ज्या बाबीवरुन वादंग निर्माण होऊ शकतात. मानव जातीला घातक ठरु शकतात. अशा बाबी टाळल्याने तुम्ही कमकुवत न ठरता महान ठरु शकता. जसे तुम्ही एका निरापराध मनुष्याला मारले तर तुम्ही समस्त मानव जातीला मारले, समाप्त केले असा निकष होतो. तसेच थोडे मागे सरकल्याने, कमी पणाचे नाही, तोच मनुष्य समस्त मानवजातीचे विचार करणारा, समजुतदार व मोठ्या मनाचा ठरत असतो हे इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लाहो ताआला अलैहे वस्लम यांची शिकवण असुन समस्त समाज बांधवांचा विचार करून व हजरत मोहम्मद पैगंबर यांचे खरे अनुयायी कसे असतात हे दाखवुन दिले असल्याचे प्रास्ताविकात यादे हुसैन आलम कमिटी चे शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान पत्रकार यांनी सांगितले.
शहरातील अनेकांनी आम्हाला सांगितले चर्चा केलेनंतर, दोन्ही उत्सव शांततेत उत्साहाच्या वातावरणात पार पाडावेत म्हणून कुठलीही अनबन – वाद विवाद न होवो. मुंबई – पुणे बरोबरच महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरांत हा निर्णय करण्याचे ठरले नुसार म्हणूनच ईद मिलादुन्नबी कमिटीने हा निर्णय घेतला. तसेच आज आमचा येथे जो यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला. या बद्दल यादे हुसैन आलम कमिटी चे जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान पत्रकार, मिरा फौंडेशन, राजु जहागिरदार व शहरातील उपस्थित असलेल्या मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो असे ईद मिलादुन्नबी कमिटीचे प्रमुख अब्दुल कादीर शेख यांनी सांगितले.
यावेळी सय्यद शहा फैसल (शानू), शेख हाजी मोहम्मद अ.गफुर, शेख नदीम मोहम्मद युसुफ, शेख हाफीज हुसैन, मौलाना मखतुब सिद्दीकी, हाजी खलील चौधरी, राजु जहागिरदार, शेख अश्फाक रहेमान (मुन्ना भाई), अजीम राजे, शेख अनीस हुसैन बावा, शेख कासिम इब्राहिम, शेख हुसेन हाफिज, शेख रफीक सर, शेख फारुख मोहम्मद शब्बीर, शेख जुबेर शब्बीर, शेख अल्ताफ हाजी जहुर शेख इस्माईल आदीं उपस्थित होते.



