म्हाडा सदनिकांसाठी पुणे,सोलापूर,सांगलीसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात;

मुंबई-:सरकारच्या वतीने स्वस्त घरांची लॉटरी अर्थात म्हाडाच्या घरांसाठी अर्ज नोंदणी सुरू करण्यात आले आहे या योजने अंतर्गत गरीब कुटुंबाना या द्वारे कमी किमतीत घर देण्यात येते.’प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत पुणे विभागात 5 हजार 647 घरांसाठी म्हाडाच्या वतीने काल सोडत काढण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी या सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते. आज 11 डिसेंबर ते 11 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल. तर 12 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळूंगे (चाकण) येथे 514, तळेगांव दाभाडे येथे 296, सोलापूर जिल्हयात गट नं. 238/1, 239 करमाळा येथे 77 तर सांगली येथे स.क्र.215/3 येथे 74 सदनिका अशा एकूण 961 सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. तर म्हाडा अंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी येथे 87, पिंपरी वाघेरे येथे 992 अशा एकूण 1079 सदनिका आहेत. तसेच सांगली येथे 129 सदनिका आहेत.
असा करा अर्ज-
ज्यांना म्हाडाच्या सदनिकांनमध्ये घर घ्यायची इच्छा आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/
या वर संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे जसे की नाव,पत्ता,संपर्क क्रमांक,आधार कार्ड नंबर,पॅनकार्ड नंबर,ई-मेल आयडी,फोटो,तसेच बँक अकाउंट सोबतच कॅन्सल चेक देखील आपल्याला अपलोड करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here