म्हणून रियाच्या घरी भर लाॅकडाऊनमध्ये अर्धा किलो गांजा पाठवला; समोर आले वेगळेच कारण

    803

    म्हणून रियाच्या घरी भर लाॅकडाऊनमध्ये अर्धा किलो गांजा पाठवला; समोर आले वेगळेच कारण

    सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय दररोज नवनवीन खुलासे करत आहे. यामध्ये ड्रग्स कनेक्शन आढळल्यानंतर रिया आणि रिचा भाऊ शोविक यांच्या विरोधात पुरावे सापडल्याने दोघांना अटक केली गेली आहे. सध्या रिया भायखळा जेलमध्ये आहे.

    रिपोर्टनुसार पुन्हा एकदा एनसीबीने रिया आणि सुशांतच्या ड्रग्स कनेक्शनबाबत आणखी एक खुलासा केला आहे. एनसीबीला त्यांच्या चौकशीत आढळून आलं आहे की रिया आणि सुशांतने लॉकडाऊन दरम्यान जवळपास अर्धा किलोचा गांजा रियाच्या घरी मागवला होता.

    ही लॉकमधील गोष्ट आहे. जेव्हा नुकतेच लॉकडाऊन पडले होते आणि सुशांतला काही वेळ रियाच्या घरी घालवायचा होता. त्यावेळेस सुशांतच्या घरातून रियाच्या घरी एक गांजाचे पाकीट पाठवण्यात आले होते. एनसीबीला तपासात असे आढळून आले आहे की, हे पाकीट दीपेश सावंतने एका कुरिअर बॉयला दिले होते.

    हे कुरिअर रियाच्या घरी शोविक चक्रवर्तीने घेतले होते. यामध्ये अर्धा किलो गांजा होता. गांजाचे पॅकेट पकडले जाऊ नये म्हणून त्या कुरिअरमध्ये काही घरचे समान टाकण्यात आले होते. हे कुरिअर एप्रिल महिन्याच्या मधल्या काही दिवसांत पाठवले होते.

    कुरिअर बॉयने सुशांतचा हेल्पर दीपेश सावंत आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना ओळखले आहे. इतकेच नाही तर कुरिअर बॉयचे आणि शोविक चक्रवर्तीचे फोन डिटेल्स मॅच झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत लॉकडाऊनमध्ये रियाच्या घरी जाणार होता. त्यामुळे तिथे गांजाचे पॅकेट पाठवले गेले होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here