पाथर्डी : दिनांक 21 मार्च 2022
मोहटादेवी रोडवरील पाथर्डी पलिका हद्दीतील निवासी मुकबधीर विद्यालयाजवळ एका स्त्री जातीचे सात ते आठ दिवसाचे अर्भक कोणीतरी सोडून गेल्याची घटना घडली आहे.
आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहरातील रहिवासी अजित आव्हाड यांना विद्यालयाजवळ एक लहान मूल बेवारस पणे ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आव्हाड यांनी त्या मुलीला सुरक्षित विद्यालयात घेऊन गेले.






