
माय महाराष्ट्र न्यूज: बीडच्या सावरगाव घाट इंथ पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद जाहीर केली.
सरकारचं सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे असलेलं दुर्लक्ष आणि आपल्यावर, आपल्या समाजावर होत असलेला अन्याय त्यांनी बोलून दाखवला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी ग्रामविकास मंत्री होते तेव्हा प्रत्येक गावात विकासकामं केली.
प्रत्येक समाजाचा विचार करुन योजना राबवल्या. जेवढं प्रेम मी परळीवर केलं तेवढंच पाथर्डीवरही केलं. मोनिकाताईंचा मतदारसंघ हा मला माझाच मतदारसंघ वाटतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.कारण परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं वाढलेलं प्रस्थ आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपसोबत केलेली सत्तासोबत बघता पंकजा मुंडे पाथर्डीमधून आगामी निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी पंकजा मुंडे मतदारसंघबदलणार, असं बोललं जात होतं. त्यामुळे त्या पाथर्डीमधून विधानसभा लढणार का? असा प्रश्न या विधानावरुन उपस्थित होत आहे. दरम्यान पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असून लवकरच त्या पक्षाला सोडचिठी देतील अशी राजकीय वर्तुळातचर्चा सुरु होती.
मात्र, केवळ स्वार्थासाठी पक्ष बदलावा इतकी माझी पक्षनिष्ठा लेचीपेची नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजप सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.आता आपण महाराष्ट्रभर फिरणार आहोत, राजकारणामध्ये पराभव होत असतो. माझाही झाला. मी पडले. होय, राजकारणामध्ये हे चालतंच.
पण आता मी ठरवलं. आता पडायचं नाही पाडायचं. मी पाडणार आहे. जे लोक बेरोजरागीर दूर करु शकतनाही त्यांना पाडणार. जो भ्रष्टाचारी असेल त्याला पाडणार. जो शेतकऱ्यांवर अन्याय करतो, त्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देत नाही, अशांना मी पाडणार असल्याचे त्या म्हणाल्या.





