मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील घटनेमागे अमित शहांचा हात तर नाही ना?, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

388

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली चूक आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याचा हात तर नाही ना? असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. पटोलेंच्या या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत घडलेल्या घटनेवर भाष्य केलं. “पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा १५ दिवसांपूर्वीपासूनच सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं नियंत्रण करत असते. एसपीजी गृहखात्याअंतर्गत येते. अमित शहा त्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहांचाच तर हात नाही ना असा प्रश्न निर्माण होतो. देशाच्या गृहमंत्र्यांनीच खरंतर याबाबत उत्तर द्यायला पाहिजे”, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. 

भाजप जनतेचे, शेतकऱ्यांचे, गरीबांचे प्रश्न समोर असताना या प्रश्नांकडून लक्ष विचलीत करण्यासाठी असला नौटंकीबाजपणा करत असतं. पंतप्रधान जसं आपलं रोज रुप बदलत असतात त्याचपद्धतीनं कालची घटना देखील एक नौटंकीपणा होता का असा माझा भाजापला प्रश्न आहे, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले. 

मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आणि त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. शेतकऱ्यांना दहशतवादी, आंदोलनजीवी ठरवण्याचा प्रयत्न मोदींनी केला. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. तुम्हाला आम्हाला सीरिअसली घेऊ नका. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आता शेतकरी आणि मतदार राजा तुम्हाला घरी बसवेल, असं नाना पटोले म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here