मोदींच्या भाषणाचा भाजपलाही धसका : डिसलाईकचे बटनच बंद केले….

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा रात्री आठच्या सुमाराला देशाला मार्गदर्शन करत असतात. पण आज त्यांनी सायंकाळी सहा वाजता देशाला संबोधन केले. अनेकांना वाटले काही तरी मोठी घोषणा होणार आहे. पण प्रत्यक्षात कोणतीच घोषणा न देता कोरोनाच्या नियमांचे पालन करा आणि स्वतःसह इतरांची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. मोदींचे भाषण हे 20 ते 25 मिनिटांचे असते. पण आजचा संदेश पाच  मिनिटांतच संपले.  
मोदींच्या भाषणाला नकारात्मक येणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या यू ट्यूबवरून डिसलाईकचे बटन हटविण्यात आले. कारण पाच मिनिटांतच 4330 डिसलाई आणि 2344 डिसलाईक आले होते. डिसलाईक वाढण्याचा धोका नको म्हणून ते बटनच चालू करण्यात आले नाही.  
कोरोनाची लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. जे कोरोना संपला, असे समजून वागत आहेत ते आपल्यासह इतरजणांचाही जीव धोक्यात टाकत आहेत, असा इशारा त्यांनी दिला. देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट चांगला आहे, कोरोना घटतोय, डॉक्टर, नर्सेस खूप छान काम केले आहे. जब तक दवांई नही, तब तक ढिलाई नही, असे त्यांनी सांगितले. थोडीसी बेपर्वाई आपल्याला महाग पडू शकेल. दसरा, दिवाळी, गुरूनानाक जयंती, छटपूजा, ईद अशा अनेक सणांसाठीच्या शुभेच्छा त्यांनी या वेळी दिला. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कोरोनामुळे अर्थव्यवस्था संकटात असल्याने पंतप्रधान काहीतरी महत्त्वाची घोषणा करतील. उद्योजकांना, कर्मचाऱ्यांना दिलासा, मदत देणारी योजना जाहीर करतील, अशी टिव्हीवर दिवसभर चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. त्यामुळे साहजिकच मोदींच्या या भाषणाने अपेक्षाभंगाच्या प्रतिक्रिया सोशल मिडियात उमटू लागल्या. 
मोदींचे भाषण हे भाजपच्या यू ट्यूब पेजवर 2100 जण पाहत होते. त्यावरून सोशल मिडियात टीका झाली. मोदींच्या भाषणात कोणालाच रस नसल्याचे दिसून येत असल्याचे म्हणण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here