
अहमदनगर : अश्लील व्हिडिओ क्लिप(Video Clip) व्हायरल करण्याची धमकी देऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांना ब्लॅकमेल (Blackmail) करून एक कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिलांसह एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने खंडणी मागितल्याबाबत अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime News) एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी हे बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे (Former MLA Bhimrao Dhonde) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की, ‘तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. ती सोशल मिडियावर व्हायरल करायची नसेल, तर आम्हाला एक कोटी 25 हजार रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करत दोन महिलांसह एका युट्युब पोर्टल चालवणाऱ्या तथाकथितपत्रकाराने माजी आमदाराला ब्लॅकमेल करत होते.पैसे दिले नाही तर तुमचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करूसंबंधित महिलांशी तडजोड करून देण्याचीऑफर देत बीड जिल्ह्यातील माजीआमदाराला खंडणी मागण्यात आल्यानेएकच खळबळ उडाली आहे. पैसे दिले नाहीतर तुमचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करूतर तुमचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, अहमदनगरमध्ये युट्युब चॅनेलचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून अनधिकृत न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीने कुणी तक्रार देण्यास तयार होत नाही. याचाच फायदा घेत असे युट्युब चॅनेल्स चालवणाऱ्यांचे फावत असून प्रशासनाने सुमोटो अशा युट्युब चॅनेलच्या बोगस पत्रकारांवर कठोर कारवाई करणे बनले आहे.