
कर्नाटकः हसन (कर्नाटक) येथील जनता दल (सेक्युलर) पक्षाचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी निर्णय देत रेवण्णा यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) आणि 376 (2) (एन) अंतर्गत गुन्हेगार ठरवले.
बेंगळुरूमधील लोकप्रतिनिधींविरोधातील गुन्ह्यांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. निकाल ऐकून प्रज्वल रेवण्णा न्यायालयाच्या आवारात भावुक झाले असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. बलात्कार प्रकरणासोबत रेवण्णा यांच्यावर अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोपही होता, ज्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली होती.