मोठी बातमी ! पेट्रोल, डिझेलच्या किंमती 8-10 रुपयांनी वाढणार, पण नेमकं कारण काय ?

    183

    रशियाकडून जर भारताने कच्चे तेल घेणे बंद केले नाही तर अमेरिका 100 टक्के टेरिफ लादणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. जर भारताने ही धमकी गांभिर्याने घेतली व रशियाकडून तेल आयात करणे थांबविले किंवा सर्व जगानेच रशियाकडून तेल आयात थांबविली तर पेट्रोल, डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी देखील याबाबत भीती व्यक्त केली आहे.

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला स्पष्ट धमकी दिली आहे की, 50 दिवसांच्या आत रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध संपवले नाही तर रशियावर आणि रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफ लावले जाईल. ही अप्रत्यक्ष धमकी भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांसाठी आहे, जे रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त कच्चे तेल विकत घेत आहेत. भारत सध्या आपल्या गरजेच्या 35-40% कच्च्या तेलासाठी रशियावर अवलंबून आहे. पुरवठा कमी झाला, तर जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती वाढतील आणि त्यामुळे भारतामध्ये पेट्रोल-डिझेल 8-10 रुपये प्रति लिटर

    केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले की, रशिया जगातील एकूण तेल पुरवठ्याच्या सुमारे 10% पुरवठा करतो. हा पुरवठा बाजारातून कमी झाला, तर उरलेल्या 90% उत्पादनातून संपूर्ण जगाला तेल खरेदी करावे लागेल, ज्यामुळे किंमतींमध्ये प्रचंड वाढ होईल. भारत आणि चीन हे रशियाकडून कच्च्या तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. भारत आपल्या एकूण तेलाच्या गरजेपैकी 88% तेल आयात करतो, त्यातील 38% वाटा रशियाचा आहे. जर अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे रशियाचे 10% उत्पादन जागतिक बाजारातून कमी झाले, तर क्रूड ऑईलच्या किंमती 130-140 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात. याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होईल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here