मोका प्रकरणामध्ये आरोपी अजय पठारे यास विशेष न्यायालयाकडून जामिन मंजूर
अहमदनगर : तोफखाना पो.स्टे. येथे दि.२०/०३/२०२१ रोजी दाखल गुन्हा भा.दं.वि. कलम ३९५, ३८६, ४५२ इ. व वाढीव मोका कलम ३ (१), (२) (४) अन्वये आरोपी विजय पठारे, अजय पठारे, सुरज साठे, अनिकेत कुचेकर, अक्षय शिरसाठ, प्रशांत चावरे या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये तपासा दरम्यान मोका कायदया अंतर्गत कार्यवाई करुन मोका कायदयाचे वाढीव कलम पोलीसांनी लावलेले होते. या प्रकरणामध्ये तपास पुर्ण झाल्यानंतर विशेष मोका न्यायाधिश तथा जिल्हा न्यायाधिशक क्र. १ अहमदनगर यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात मुख्य आरोपी विजय पठारे याचा भाऊ आरोपी अजय पठारे यास देखील पोलीसांनी दि.२०/४/२०२१ रोजी अटक केली होती. त्याप्रकरणामध्ये आरोपी अजय पठारे याचे वतीने अॅड. सतिश गुगळे यांनी त्याचा जामिन अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. त्यावर सविस्तर सुनावणी होऊन आजरोजी विशेष मोका न्यायालय यांनी आरोपी अजय पठारे यास जामिनावर मुक्त करण्याचा आदेश केला. या प्रकरणात आरोपींच्यावतीने सदर गुन्हयामध्ये आरोपी याचा सहभाग नाही. तसेच सादर करण्यात आलेला पुरावा व सि.सी.टी.व्ही. फुटेज हे आरोपीचा गुन्हयात असलेला सहभाग दाखविण्यासाठी पुरेसे नाही, तसेच आरोपी विरुध्द दाखल असलेले एकूण पाच गुन्हेगारी खटले जरी असले तरी त्या खटल्यामुळे आरोपी यास जामिन मंजूर करण्यास कोणताही बाध येत नाही असा युक्तीवाद केला व त्याकामी उच्च न्यायालय, मुंबई व सर्वाच्च न्यायालय यांचे न्याय निवाडे सादर करुन आरोपी यास जामिन देणे कामी न्यायालयास विनंती केली.
वरीलप्रमाणे आरोपीच्यावतीने अॅड. सतिश गुगळे यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरत आरोपी अजय पठारे यास जामिनावर खुले करण्याचा आदेश केला आहे. अॅड. सतिश गुगळे यांना या प्रकरणात अॅड. महेश देवणे, अॅड. हेमंत पोकळे, अँड. घनश्याम घोरपडे व अॅड. विशाल पठारे यांनी सहकार्य केले.