
मुकुंदनगर, फकीरवाडा परिसरातील नागरिक व माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन.
नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, फकीरवाडा परिसरामध्ये मोकाट व पिसाळलेले कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी केल्या असून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद नगर फकीरवाडा परिसरातील नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, मुकुंद नगर परिसरात विविध ठिकाणी मोकाट कुत्रे धुमाकूळ घालत असून सकाळच्या वेळी लहान मुले शाळेत जाताना त्यांच्यावर भुंकून हल्ला करतात तसेच महिला व वृद्धांना सुद्धा या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे मुकुंद नगर परिसरात विविध ठिकाणी नेहमीच कोणाला ना कोणाला तरी कुत्रा चावण्याची घटना घडत आहे तरी मनपा प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन मोकाट व पिसाळलेले कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा येणाऱ्या गुरुवारी 17 जुलैला महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या दालनात कुत्रे सोडू आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यानी निवेदनाद्वारे दिलेला आहे.