“मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्या लायक नाहीत”, Vivek Agnihotri यांचा Arvind Kejriwal यांच्यावर पलटवार

466

मुंबई : ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावरुन सध्या देशाचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय. सामाजिक क्षेत्रासोबतच राजकीय मंडळीही या सिनेमाबाबत बोलताना दिसत आहेत. अश्यातच आता दिल्लीच्या विधानसभेतही या सिनेमावर चर्चा झाली. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपलं मत मांडलं. “टॅक्स फ्री करण्यापेक्षा हा सिनेमा यूट्यूबवर टाका सगळ्याना तो मोफत पाहता येईल”, असं केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या या विधानाला आता या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी प्रत्युत्तर दिलंय. “मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्या लायक नाहीत”, असं अग्निहोत्री म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर विवेक अग्निहोत्री यांनी आक्षेप नोंदवला. भोपाळमधल्या चित्र भारती फिल्म फेस्टिव्हलला त्यांनी हजेरी लावली. तेव्हा तिथल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर आपलं मत मांडलं. त्यांना केजरीवाल यांच्याबाबात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा “काही लोकांना तर असं वाटतं की देवानं पृथ्वीवर यावं. आपण नेहमी अशा मूर्ख लोकांपासून जपून राहायला हवं. त्यांचं म्हणणं मनावर घेऊ नये. त्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही:, असं अग्निहोत्री म्हणाले.

‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यांवरुन सध्या रोजदार चर्चा होतेय. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपत करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. “8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही”, अशा शब्दात केजरीवाल यांनी मोदींवर हल्ला चढवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here