कऱ्हाड : गुंडांमध्ये वचक निर्माण करणाऱ्या सिंगम स्टाईल पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांची वर्षातच तिसऱ्यांदा तडकाफडकी बदली झाली. त्याला राजकीय वादाची झालर असून दोन वर्षापूर्वी कोल्हापूर येथे महापौर निवडी वेळी ज्येष्ठ नेते व विद्यमान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी झालेला वादाचे पडघम आत्ताच्या बदली मागे ही आहेत. मात्र, चांगल्या कामाचे सरकारने सुरज गुरव यांना गिफ्ट दिल्याची ही पोलिस वर्तूळात चर्चा आहे. पोलिस उपअधीक्षक गुरव यांची कऱ्हाडला वर्षापूर्वी 22 सप्टेंबर 2019 मध्ये बदली झाली. हजर झालेल्या दिवशीच त्यांनी त्यांची भुमिका स्प्ष्ट केली. स्वागताला येणाऱ्यांचा बायोडाटा आधीच समोर ठेवत त्यांना नीट वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नवीन आहेत, बघू असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या किमान डझनभर कुख्यात गुंडाना श्री. गुरव यांनी खाकी स्टाईलने सरळ केले. पोलिस खात्यात हटके काम केल्याने श्री. गुरव यांचा चांगलाच गवगवा झाला. पोलिस उपअधीक्षक गुरव यांची कोल्हापूर येथील कारकीर्द चांगलीच गाजली होती. दोन वर्षापूर्वी महापौर निवडीवेळी त्यांचा कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. हमरीतुमरीपर्यंत गेलेल्या वादाची त्यावेळी राज्यभर चर्चा झाली होती. त्यावेळी तेथून श्री. गुरव यांची तडकाफडकी चिपळूणला बदली झाली होती. तेथे वर्षभर काम करतात तोच तेथूनही त्यांची थेट कऱ्हाडला बदली झाली. कऱ्हाडमध्ये त्यावेळी स्थिती हातळण्याची कसोटी होती. भर चौकात गुंडाचा गोळ्या घालून खून झाला होता. त्याच्या तपासापासून गुंडगिरीवर पोलिसांचे नियंत्रण आणण्याची कार्यवाही त्यांनी केली. त्यामुळे त्यांचे नावही झाले. त्या चांगल्या कामाचे गिफ्ट त्यांना मिळाले. येथे येऊन वर्षभराचा कालवधी पूर्ण होतोय त्याला चार दिवसही होत नाहीत, तोच त्यांची बदली नागपूरला सहायक पोलिस आयुक्तपदी झाली आहे. त्यामागे दोन वर्षापूर्वी झालेल्या वादाची झालर असल्याची चर्चा आहे.
Home महाराष्ट्र अहमदनगर मुश्रीफ यांच्याशी पंगा घेणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांची तिसऱ्यांदा तडकाफडकी बदली
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
UP Election : उत्तर प्रदेशात भाजपकडून 91 उमेदवारांची यादी जाहीर; मीडिया सल्लागार शलभमणि त्रिपाठी...
UP Election 2022 : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपसाठी...
बालासोर ट्रेन अपघात प्रकरणी सीबीआयने 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली आहे
बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने शुक्रवारी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली.
2 जून...
CBSE Exam : CBSE विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, टॉपर्स विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका वेबसाईटवर करणार अपलोड
CBSE Class 10th 12th Exam 2022 : दहावी बारावी बोर्डाच्या सीबीएसई परीक्षेला बसणाऱ्या विद्यांर्थ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण...
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणार्या महसूल अधिकारी-कर्मचारी यांचा गौरव
नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य हवे: जिल्हाधिकारी डॉ. भोसले
अहमदनगर: महसूलविषयक कामकाज करतानाच कामासाठी येणारा प्रत्येक नागरिक समाधानाने...





