मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोविंदा पथकांशी ई-संवाद साधला.जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा-मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या कळकळीच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोरोनाचे सावट लक्षात घेऊन दहीहंडीऐवजी सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावना व्यक्त केल्या.