मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड संदर्भात राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत ई-बैठक घेतली. आपल्याला लॉकडाऊन आणि विषाणूमुळे नॉकडाऊन, हे दोन्हीही नको आहे. कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण देशात निर्माण करायचे आहे- मुख्यमंत्री
बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, संजीव बजाज, बी. थियागराजन, डॉ. नौशाद फोर्बस, अमित कल्याणी, अशोक हिंदुजा, ए.एन. सुब्रमनियन, डॉ. अनिश शहा, अजय पिरामल, बनमाली अग्रवाल, हर्ष गोयंका, सुनील माथूर, उज्ज्वल माथूर, संजीव सिंग, बोमन इराणी, निरंजन हिरानंदानी, जेन करकेडा, असीम चरनिया, सुलज्जा फिरोदिया आदी उपस्थित. निर्बंधांसंदर्भात निकष आणि पातळ्यांचा निर्णय चांगला आहे. याबाबत लोकांमध्ये योग्य रीतीने जनजागृती होणे अपेक्षित असल्याचे उद्योजकांनी मत व्यक्त केले.