मुकूंदनगर अहमदनगर मधील वेगवेगळया पाच दुकानामधुन जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

    243

    क्रमांक पीआरओ/प्रेसनोट/70/2023 प्रेस नोट दिनांक :- 20/04/2023

    महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 3,06,000/- ( तीन लाख सहा हजार) रु. किंमतीचे 1,530 (एक हजार पाचशे तीस) किलो गोमास, मुकूंदनगर अहमदनगर मधील वेगवेगळया पाच दुकानामधुन जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

    मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
    नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/विश्वास बेरड, पोना/संतोष लोंढे, पोकॉ/जालिंदर माने, सागर ससाणे, रोहित येमुल, रविंद्र घुंगासे, रणजित जाधव, मयुर गायकवाड व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर अशांना त्यांच्या दालनात बोलावुन घेवुन कळविले की, आताच गुप्तबातमीद्वारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे 1) मुहंमद नूर कुरेशी हा आर. आर. बेकरीजवळ, मुकूंदनगर, 2) इरशात शफीक कुरेशी हा वाबळे कॉलनी, मुकूंदनगर, 3) सादीक गुलामनबी कुरेशी हा व्यापारी मोहल्ला, अहमदनगर, 4) आरीफ कुरेशी हा नवेद कॉम्प्लेक्स, मुकूंदनगर व 5) शफीक नुर कुरेशी हा बजाज कॉलनी, मुकूंदनगर असे त्यांचे दुकानामध्ये गोवंशी जातीचे जनावरांची कत्तल करुन गोमासची दुकानामध्ये विक्री करत आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
    स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच दोन पंचाना सोबत घेवुन मुकूंदनगर येथील वर नमूद 5 ठिकाणी खात्री करणेकामी गेले असता पहिले ठिकाणी आर.आर. बेकरीजवळील दुकानात एक इसम दुकानात गोमांस विक्री करताना मिळून आल्याने सदर ठिकाणी छापा टाकुन नमूद ठिकाणी मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) वसीम महंमद कुरेशी, वय 25, रा.सदर बाजार भिंगार असे सांगीतले. त्यास दुकानाचे मालकाबाबत विचारपुस केली असता त्याने दुकानाचा मालक 2) महंमद नूर कुरेशी, रा. सदर बाजार भिंगार (फरार) असल्याचे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात 280 किलो गोमास, एक वजनकाटा व एक एक किलो वजन माप व एक धारदार सत्तुर असा एकुण 57,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
    त्यानंतर पथकाने दुस-या ठिकाणी वाबळे कॉलनी मुकूंदनगर येथे जाऊन खात्री केली असता दुकानात एक इसम दुकानात गोमांस विक्री करताना मिळून आल्याने सदर ठिकाणी छापा टाकुन नमूद ठिकाणी मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) रफीक कासम कुरेशी, वय 52, रा.सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहमदनगर असे सांगीतले. त्यास दुकानाचे मालकाबाबत विचारपुस केली असता त्याने दुकानाचा मालक 2) इरशात शफीक कुरेशी, रा. झेंडीगेट, अहमदनगर (फरार) असल्याचे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात 330 किलो गोमास व एक धारदार सत्तुर असा एकुण 66,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
    पथकाने बातमीतील तिसऱ्या ठिकाणी व्यापारी मोहल्ला, मुकूंदनगर येथे जाऊन खात्री केली असता दुकानात एक इसम दुकानात गोमांस विक्री करताना मिळून आल्याने सदर ठिकाणी छापा टाकुन नमूद ठिकाणी मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) निसार गुलामनबी कुरेशी, वय 33, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर असे सांगीतले. त्यास दुकानाचे मालकाबाबत विचारपुस केली असता त्याने दुकानाचा मालक 2) सादिक गुलामनबी कुरेशी, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर (फरार) असल्याचे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात 260 किलो गोमास व एक धारदार सत्तुर असा एकुण 52,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
    पथकाने बातमीतील चौथ्या ठिकाणी नवेद कॉम्पलेक्सजवळ, मुकूंदनगर येथे जाऊन खात्री केली असता दुकानात एक इसम दुकानात गोमांस विक्री करताना मिळून आल्याने सदर ठिकाणी छापा टाकुन नमूद ठिकाणी मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) आरीफ शब्बीर कुरेशी, वय 42, रा.नालबंद खुट, पिंजारगल्ली, अहमदनगर असे सांगीतले. त्यास दुकानाचे मालकाबाबत विचारपुस केली असता त्याने दुकानात मालक मी स्वत: असल्याचे कबुल केले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात 350 किलो गोमास, एक वजनकाटा, एक एक किलो वजनाचे वजनमाप व एक धारदार सत्तुर असा एकुण 71,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
    वर नमूद चारही ठिकाणी जप्त केलेला मुद्देमाल व आरोपीसह पथकाने बातमीतील पाचव्या ठिकाणी बजाज कॉलनी, मुकूंदनगर येथे जाऊन खात्री केली असता दुकानात एक इसम दुकानात गोमांस विक्री करताना मिळून आल्याने सदर ठिकाणी छापा टाकुन नमूद ठिकाणी मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) समीर शफीक कुरेशी, वय 28, रा. सदर बाजार, भिंगार, अहमदनगर असे सांगीतले. त्यास दुकानाचे मालकाबाबत विचारपुस केली असता त्याने दुकानाचा मालक 2) शफीक नूर कुरेशी, रा. सदर बाजार, भिंगार, अहमदनगर (फरार) असल्याचे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात 310 किलो गोमास, एक वजनकाटा व एक धारदार सत्तुर असा एकुण 63,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
    वरील 5 ठिकाणावरून ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जातील एकुण 1,530 किलो गोमांस किंमत 3,06,000/- रु. ( तीन लाख सहा हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 223/2023 भादंवि कलम 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
    सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उविपोअ, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

    पोलीस अधीक्षक, अहमदनगर
    यांचे करीता

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here