मुकुंदनगरच्या आरोग्य केंद्रात जनरल हॉस्पिटलची मान्यता देवून महिलेची प्रसुति व्यवस्था करून पुर्णवेळ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी-माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक.

    174

    मुकुंदनगरच्या आरोग्य केंद्रात जनरल हॉस्पिटलची मान्यता देवून महिलेची प्रसुति व्यवस्था करून पुर्णवेळ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी-माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक.
    अहमदनगर (प्रतिनिधी)- उपनगर म्हणून ओळखला जाणारया मुकुंद नगर भागामध्ये ६० हजार पेक्षा जास्त लोक वस्ती असून येथे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्राची इमारत असून त्या इमारतीला संरक्षण भिंत सुद्धा बांधण्यात आलेली आहे. तसेच या भागात बऱ्याच प्रमाणात अल्पसंख्यांक समाज रहात असून या भागात बहुतांश मध्यम व गरीब वर्ग रहातो. तसेच येथील नागरिकांना रात्रीच्या वेळी काही त्रास झाल्यास जनरल दवाखाने नसून या करिता येथे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्रात जनरल हॉस्पिटलची मान्यता द्यावी व येथे असलेल्या आरोग्य केंद्रात महिलांच्या प्रसुतिची व्यवस्था करून २४ तास डॉक्टर उपलब्ध करून द्यावे. व तेथे ईसीजी व बीपी चेक करण्याची मशीन बसवण्यात यावी जेणेकरून मुकुंद नगर भागातील नागरिकांना रात्री अपरात्री शहरांमध्ये न येता तेथेच आपली वैद्यकीय तपासणी करून घेणार व नागरिकांना याचा मोठ्या फायदा होणार असून या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त यांना देताना माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक समवेत फारुक शेख आदी उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here