मुंबई महापालिकेला 2 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत -कंगणा राणावत
मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेनेतील संघर्ष चांगलाच पेटला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कंगणा राणावतच्या कार्यालयावर कारवाई केली होती. यावर कंगणाने मुंबई महापालिकेकडे नुकसान भरपाई म्हणून कोटींमध्ये रक्कम मागितली आहे.
कंगनाने महापालिकेच्या कारवाईविरोधात याआधी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करत महापालिकेला 2 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही तिने आता केली आहे.
कंगणाने बंगल्याच्या एकूण मालमत्तेपैकी 40 टक्के नुकसान झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावर पुढील आठवडयात मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला जर कंगणाचं बांधकाम अनाधिकृत असल्याचं सिद्ध नाही करू शकली तर महापालिकेला नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्या खिशातील 2 कोटी रूपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, कंगणा राणावत मुंबई सोडली असून मनालीला गेली आहे. कंगणाला तिकडे 15 दिवस क्वारंटाईन केलं आहे. मात्र कंगणाला हिमाचल प्रदेशच्या सरकारने दिलेली सुरक्षा तरीही चालूच राहणार आहे.