मुंबई बाॅम्ब ब्लास्ट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची याच्याशी संबंधित असलेल्या कंपनीच्या खात्यातून भारतीय जनता पक्षाला १० कोटींची देणगी देण्यात आली असा गंभीर आरोप भाजप माजी आमदाराने केला आहे.

536
  • मुंबई : आजपासून विधिमंडळ अधिवेशन चालू झाले आहे. आणि राज्य सरकार (State Government) व भाजपमध्ये (Bjp) पहिल्याच दिवशी चांगली जुंपली आहे.
  • यावेळी भाजपने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याचा मुद्दा घेऊन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
  • याप्रसंगी भारतीय जनता पक्षाला १० कोटींची देणगी की खंडणी दोन वेळा देण्यात आली आहे. त्यामुळे अतिरेक्यांशी संबंध जोडून ईडी (ED) जर मंत्री नवाब मलिक यांना अटक करू शकते.
  • तर तोच न्याय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही लावण्यात यावा, अशी मागणी भाजप माजी आमदाराने इडीकडे केली आहे.
  • त्यामुळे भाजपचे माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी आज मुंबई (Mumbai) येथील ईडी कार्यालय जाऊन भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
  • तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, आज तक्रार दिल्यानंतर मी ८ दिवस वाट पाहणार आहे. त्यानंतर मी दर मंगळवारी भाजपच्या एकेक नेत्याच्या विरोधात ईडीकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा गोटे यांनी दिला आहे.
  • दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. त्यानंतर २०१४-१५ मुंबई बाॅम्ब ब्लास्ट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची याच्याशी संबंधित असलेल्या कंपनीच्या खात्यातून भारतीय जनता पक्षाला १० कोटींची देणगी देण्यात आली असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here