क्रिकेट क्षेत्रात खळबळ : मुंबई इंडियन्सच्या कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर अटक !
मुंबई इंडियन्सच्या कृणाल पांड्या याला मुंबई विमानतळावर डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यूएईमधून आयपीएल २०२० चा हंगाम खेळून मायदेशी परतल्यावर कृणाल पांड्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
त्याच्याकडे नियमापेक्षा अधिक सोनं आढळून आल्याचे तपासात दिसून आले आहे. प्रवासादरम्यान त्याच्याजवळ हवाई वाहतूक नियमावलीतील प्रमाणापेक्षा जास्त सोनं सापडलं आहे.
प्राप्त माहितीनुसार कृणाल पांड्याकडे सोन्याची दागिने, बांगड्या आणि इतर मौल्यवान वस्तू आढळून आले आहे. प्रवासाच्या नियमानुसार त्याने अधिक सोनं बाळगल्याने त्याची मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मुंबई विमानतळावर ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सोनं आणल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत असताना ही कारवाई करण्यात आली. दुबईहून येताना त्याच्याकडे जास्त सोनं सापडलं. त्यामुळेच डीआरआयनं (महसूल गुप्तचर विभाग) त्याला ताब्यात घेतले आहे.
2016 च्या आयपीएलमध्ये पदार्पण झाल्यापासून पांड्या मुंबई इंडियन्स संघातून खेळत आहे. कृणालने आतापर्यंत 55 सामने खेळले आहेत आणि 891 धावा केल्या आहेत. तसेच आतापर्यंत 40 विकेट्सही घेतल्या आहेत. कोरोनामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम सामना जिंकत पाचव्यांदा जेतेपद मिळवले आहे. कृणाल पांड्यादेखील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. आयपीएल जिंकून कृणाल पांड्या गुरुवारी दुबईहून भारतात परतला.
कृणाल पांड्या हा मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे. तो हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ आहे. हार्दिक टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेला आहे. त्याचवेळी कृणाल आयपीएल संपल्यानंतर भारतात परतत होता. कृणाल हा डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज आहे. तो भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील खेळला आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्सने पराभूत करत विजय मिळवला. यासोबतच आयपीएलचे ५वे विजेतेपदही पटकावले. यानंतर खेळाडू आपापल्या मायदेशात परतले.
युएईमधून भारतात परतलेला मुंबई इंडियन्सचा खेळाडू कृणाल पंड्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतल्याचे वृत्त समाज माध्यमात पसरल्याने चाहते चिंतेत आहेत.





