मुंबईसह, ठाणे, पालघरमध्ये आज वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील काही भागात 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज असून मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील काही भागात सोमवार मंगळवारी वादळी वाऱ्यांसह 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता असून जिल्ह्यात दोन दिवसांसाठी अंबर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी जिल्ह्यात आज अंबर अलर्ट असून मंगळवारी काही भागात अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.