
मुंबईतील जुहू चौपाटीवर गुरुवारी विजेच्या धक्क्याने एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात हा तरुण गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपती विसर्जन पाहण्यासाठी एकटाच आला होता, असे पोलिसांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन युसूफ शेख असे या मुलाचे नाव असून तो सांताक्रूझ येथील वाकोला येथील रहिवासी आहे.



