
मुंबई : मुंबईत आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 15 दुकाने आणि घरांचे नुकसान झाले आहे. गोवंडीतील बैगनवाडी येथे पहाटे चारच्या सुमारास आग लागली. आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
या आगीत तळमजल्यावरील सुमारे 15 गाळे (व्यावसायिक युनिट) आणि पहिल्या मजल्यावरील काही घरांचे नुकसान झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
रहिवासी पाण्याच्या बादलीने आग विझवतानाही दिसत होते.
या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग व इन्स्टॉलेशन, घरातील वस्तू, एसी शीट, प्लास्टिक शीट, एलपीजी सिलिंडर, लाकडी फळी, फर्निचर जळून खाक झाले.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याआधी शुक्रवारी बोरीवली उपनगरातील एका मोकळ्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत २० हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले होते.