
महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असताना आता त्यांची पुढची पिढीदेखील मैदानात उतरलीय. अमित आणि आदित्य ठाकरेंनी महापालिका उमेदवारांचे मार्गदर्शन केलं. तसेच मुंबईकरांना आपण हक्काचे घर देणार असून पुढच्या 5 वर्षात 1 लाख घरे देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना यावेळी म्हटलं. आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव यांनी प्रेझेटेशनमध्ये दिलेले आश्वासन
महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी बिल्डरांच्या घशात न घालता त्याठिकाणी मुंबईकरांची सेवा करणाऱ्या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामगारांना हक्कांची घरे देणार तसेच मुंबई महापालिकेचे स्वतःचे गृहनिर्माण प्राधिकरण असेल. पुढच्या 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी हक्कांची घरे दिली जातील.
परिवहन – सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास.
तिकीट दरवाढ कमी करून 5-10-15-20 असे दर ठेवणार.
बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस आणणार
900 डबल डेकर इलेक्ट्रिक बस जुने मार्ग पुन्हा सुरू करणार.
महिला आणि विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास





