मुंबईकरांना मोठा दिलासा, मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या

356

Mumbai Coronavirus Cases : मुंबईत मागील काही दिवसांपासून स्थिरावलेली कोरोना रुग्णांची संख्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. त्यानंतर आजतर (शनिवार) मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या समोर आली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 3568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 10 जणांचा कोरोनावरील उपचार घेताना मृत्यू झाला आहे. 

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार नव्याने आढळलेल्या 3 हजार 568 रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 497 झाली आहे. तर 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 522 झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे. 

सध्या मुंबईतील 32 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 3 हजार 568 रुग्णांपैकी 485 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने 37 हजार  746 बेड्सपैकी केवळ 4 हजार 293 बेड वापरात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here