
◼️ मिठाईवाला प्रकरणः हिंदीवर ठाम राहणाऱ्या मिठाईवाल्याला कानाखाली मारण्याचा उल्लेख – “अहंकार असेल तर उत्तर मिळेल” असा इशारा.
◼️ त्रिभाषा धोरणावर टीकाः शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका, “पाचवीपर्यंत हिंदी अनिवार्य? मग शाळाच बंद करू.
◼️ “मुंबईवर डावः हिंदी वाढवून मुंबईवर नियंत्रण मिळवण्याचा डाव असल्याचा इशारा.भाषा आणि अस्तित्वः “भाषा गेली की जमीनही जाते” – मराठीचा अभिमान बाळगा.
◼️ हिंदी वाहिन्यांचा दबाव: मराठीतून आवाज उठवला की हिंदी मीडिया मोठा हल्ला करते.
◼️ हिंदीचा इतिहास नाही: मराठीचा २५०० वर्षांचा वारसा आहे, हिंदीला तो दर्जा नाही.
◼️ हिंदी मातृभाषा नाहीः ती इतर भाषांवर लादली जाते, याला विरोध हवा.
◼️ भाषा जबरदस्ती नकोः कोणतीही भाषा लादू नका, प्रेमाने शिकवा.हिं
◼️ हिंदवी स्वराज्याचा मुद्दा: “हिंदुत्व” नव्हे, “हिंदवी स्वराज्य” – मराठी अस्मिता जपूया.
◼️ मराठीतच व्यवहार कराः व्यवसाय करणाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करावा.
◼️ दुबे वादग्रस्त वक्तव्यः मराठ्यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी.”रस्त्यावर सत्ता आमची”: सरकारच्या विधानसभेची सत्ता असो, पण रस्त्यावर ताकद आमची.
◼️ स्क्रिप्टप्रमाणे निर्णय?: काही निर्णय आधी लिहिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे घेतले जातात, असा आरोप.
◼️ तडजोड शक्य नाहीः “मराठी, महाराष्ट्र यावर कोणतीही तडजोड होणार नाही.”
◼️ मराठीत बोला आणि बोलवाः मराठीतच संवाद साधा, इतरांना मराठीत बोलायला भाग पाडा.