मिशन महाग्राम अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाला २० मेडीकल बेड्सचे वाटप

821

अहमदनगर: महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत मिशन महाग्राम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय जामखेडला 20 मेडिकल बेडचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, मिशन महाग्राम अभियान अंतर्गत व सिंजेटा इ. प्रा.लि. यांचे कडून ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे 20 सेमी फोवलर मेडीकल बेड, चटई, उशा, बेडशिट याचे हस्तांतरण करण्यात आले.


कोविड-19 चा शहराबरोबर ग्रामीण भागात देखील प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास येत आहे. सदर जागतिक महामारीची तीव्रता लक्षात घेता तसेच तज्ञांनी व्यक्त केलेल्या कोरोना संसर्गाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाअंतर्गत सुरु असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने व विविध कार्पोरेट कंपनीच्या भागीदारीतून ग्रामीण भागातील कोविड विषाणूची साखळी तोडण्यासाठी मिशन महाग्राम अभियान महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. कोलेशन टु ब्रेक द चेन अशी या अभियानाची थीम असुन, ग्रामीण भागातील वैद्यकिय सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी कार्पोरेट कंपन्यांचा सी. एस.आर. निधी उभारण्याचे काम या मोहिमेतून होत आहे. या अभियानासाठी कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व सीएसअर निधीतून कोविड महामारी रोखण्यासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच हे अभियान जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाने जिल्हयामध्ये राबविण्यात येत आहे.


हा कार्यक्रम नायब तहसिलदार श्री. लांडगे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय संजय वाघ, व्ही. एस.टी.एफ. अहमदनगरचे संजय चव्हाण, सिंजेटाचे बिझनेस मॅनेजर सुभाष ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शिवाजी माने, डॉ. रवींद्र टाकसाळ, राहुल वास्कर, अर्चना घोडके, अर्चाना धोंडे, रणसिंग साहेब, श्याम जाधव, सचिन बेग, रवींद्र लबाडे इत्यादी उपस्थित होते.

***


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here