मिरावली दर्गा ( पहाडवर) पाण्यासाठी भाविकांना वनवन करण्याची वेळ

    330

    भाविक भक्तांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

    अहमदनगर- पीर मिरावली दर्गा ट्रस्ट हे एक तीर्थक्षेत्र आहे. अहमदनगर तालुक्यात असलेले हे “क” वर्ग तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत असतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून येथे पाण्यासाठी पर्यटकांना तसेच भाविकांना वनवन करण्याची वेळ आली आहे. अहमदनगर येथे संपुर्ण भारतातुन भाविक येत असतात. यावर आज मिरावली पहाड येथील नागरीकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

    यावेळी अरुण जाधव, अजय भोसले, शेख फैरोज, शेख फारुक रशीद, अभिजीत . अबनावे, अक्षय कांबळे, प्रशांत ठोंबरे, अक्षय लाड, प्रविण मंगुडकर, विलास सपाटे, निखिल गांगर्डे, सचिन भोगे, शिवाजी गांगर्डे,शेख इकबाल,सिराज शेख, असिफ मणियार, प्रशांत जाधव, विश्वजीत दिघे, विलास कुलार, अमर पवार, अक्षय करंडे, सागर कुन्हे,आदिंसह भाविक व नागरीक मोठ्या संख्येणे उपस्थित होते. निवेदनात म्हंटले आहे की, सदर ठिकाणी आजमितीला पाणी योजनेच्या माध्यमातून थेंबभर देखील पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे व पर्यटकांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत. येणाऱ्या भाविकांमध्ये लहान मुले, वयोवृध्द भाविक रोज दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. पाण्याअभावी पर्यटकांसोबत एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणचा पाणीपुवठा सुरळीत व मुबलक पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी यावेळी पहाडवरील भाविक भक्तांनी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here