मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी उल्हासनगरमध्ये

562

उल्हासनगर : मित्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) उल्हासनगरमध्ये (ulhasnagar)आला होता. अचानक आलेल्या रोहित शेट्टीला पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचं झालं असं आशिष चंचलानी (ashish chanchlani) हा युट्युब स्टार उल्हासनगर मध्ये राहतो. आशिष चंचलानीला दिग्दर्शक रोहित शेट्टी याने तुला भेटण्यासाठी मी उल्हासनगरमध्ये नक्की येईल असे वचन दिले होते. मित्राला दिलेले हे वचन काल त्याने  पूर्ण केले.

रोहित शेट्टी मित्राला भेटून थेट सेंट्रल पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रोहितचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं. तसेच पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही रोहितचं स्वागत केलं. 

यावेळी रोहित शेट्टीची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचा सोबत सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी झाली होती. रोहित देखील दिलखुलासपणे आपल्या फॅन्ससोबत सेल्फी काढताना दिसून आला. रोहित शेट्टीचा सुर्यवंशी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रमोशन करण्याकरता उल्हासनगरमध्ये आल्याचं बोललं जातं होतं. 

पोलिसांची भूमिका सकारात्मक दाखवत असतो म्हणून पोलिसांनी त्याचं स्वागत केला. रोहित यावेळी म्हणाला की, कोरोनामुळं सिनेमे प्रदर्शित होण्यास अडचणी येत होत्या. आताही कोरोना गेलेला नाही. मात्र कमी झाला आहे. आपण प्रोटोकॉलचं पालन करणं गरजेचं आहे. त्यानं म्हटलं की, कोरोनामुळे कुठल्याही फिल्म रिलीज झाल्या नव्हत्या, आता कोरोना कमी झालाय म्हणून फिल्म रिलीज होऊ लागल्या आहेत. यापुढेही सर्व व्यवस्थित होईल अशी भावना रोहित शेट्टीने व्यक्त केली.

‘सूर्यवंशी’ सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमार आणि कतरिना कैफसह अजय देवगन आणि रणवीर सिंह यांचीही सिनेमात विशेष भूमिका आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 26.29 कोटी तर दुसऱ्या दिवशी 23.85 कोटींची कमाई केली होती.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here