मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

453

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या तीन तरुणांच्या गाडीचा अपघात झाला. वाळूच्या डंपरने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी आहे, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. नशीराबाद येथील सुनसगाव रोडवर हा भीषण अपघात झाला.

जळगाव : मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या तीन तरुणांच्या गाडीचा अपघात झाला. वाळूच्या डंपरने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी आहे, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. नशीराबाद येथील सुनसगाव रोडवर हा भीषण अपघात झाला.

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघातजळगावपासून जवळच असलेल्या नशीराबाद येथील सुनसगाव रोडवरील उड्डानपुलाच्या खाली असलेल्या बोगद्याजवळून मित्राचा वाढदिवस साजरा करून येणाऱ्या तिघांना भरधाव वेगात येणाऱ्या रेतीच्या डंपरने जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. तर एकाला किरकोळ दुखापत झाली असून या दोघांवर उल्हास पाटील रूग्णालयात उपचार सुरू आहे.

नशीराबादच्या सिद्धार्थ नगरात राहणारे विशाल उर्फ विकी रमेश रंधे (वय 25), रोहित दगडू इंगळे ( वय25), उदय भगवान बोदळे (वय 23)असे तिघेजण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस साजरा झाल्यावर घराकडे परतत असताना सुनसगाव रोड कडून महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या डंपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात विशाल रमेश रंधे (वय 25) याचा जागीच मृत्यू झाला.मृत विशालच्या नातेवाईकांचा रुग्णालयासमोर हंबरडारोहित दगडू इंगळे (वय 25) याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. तिघा मित्रांच्या अपघाताने नशिराबादसह परिसरात शोकाकुल वातावरण आहे. तर मृत विशाल रंधेच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच आक्रोश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here