मिझोराममध्ये फटाके विक्रिला बंदी; फटाके आढळल्यास होणार मोठा आर्थिक दंड

508

मिझोराम सरकारने सणोत्सवाच्या काळात होणाऱ्या फटाखे विक्रीला प्रतिबंध केला आहे. याबाबत माहिती देताना मिझोरामच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फटाक्यांमुळे प्रदूषणामध्ये भरत पडत आहे. हवा दूषीत होत असल्याने फटाके बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयझॉल – मिझोराम सरकारने सणोत्सवाच्या काळात होणाऱ्या फटाखे विक्रीला प्रतिबंध केला आहे. याबाबत माहिती देताना मिझोरामच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फटाक्यांमुळे प्रदूषणामध्ये भरत पडत आहे. हवा दूषीत होत असल्याने फटाके बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मिझोराममध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. याकाळात एअर क्वॉलेटी इंडेक्स हा प्रचंड वाढतो, त्यामुळे यंदा फटाख्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या काळात कोणी फटाके विकताना आढळून आल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाच्या मदतीने फटाका विक्रीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

प्रदूषणमुक्त उत्सव साजरे करण्याचे आवाहन 

आयझॉलचे पोलीस निरिक्षक असलेल्या सी. लालरुआइआ यांनी म्हटले आहे की, मिझोराम सरकारकडून फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी राज्य पोलिसांची एक विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. ही टीम राज्यभरातील दुकाने आणि गोदामांना भेट देऊन त्यांची झडती घेणार आहे. फटाके आढळून आल्यास संबंधित विक्रेत्याला दंड करण्यात येणार आहे. मिझोराममधील नागरिकांनी फटाके न फोडता प्रदूषणमुक्त उत्सावांचा आनंद घ्यावा असे आवाहन देखील यावेळी लालरुआइआ यांनी केले आहे.

फटाक्यामुळे दिल्लीचे प्रदूषण वाढले

दरम्यान दिवाळीपूर्वी दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये फटाक्याच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला होता. मात्र तरी देखील मोठ्याप्रमाणात फटाक्यांची विक्री झाली. परिणामी दिवाळीच्या काळामध्ये दिल्लीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दिल्लीचा एअर क्वॉलेटी इंडेक्स हा 400 वर पोहोचला होता. ही हवेची सर्वाधिक धोकादायक पातळी मानण्यात येते. तसेच पंजाबमध्ये देखील हवा प्रदूषणाची पातळी वाढली होती. हवा प्रदूषणामुळे श्वास घेता न येणे, डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे अशा विविध समस्यांचा सामना दिल्लीतील नागरिकांना करावा लागला होता.

सर्वोच्च न्यायालयानेही व्यक्त केली होती नाराजी 

दरम्यान एका प्रकरणातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायलयाने देखील फटाक्यांमुळे निर्माण होत असलेल्या प्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त केली होती.फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून, हा नागरिकांच्या आयुष्याशी खेळ असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्याने फटाका विक्रीवर बंदी घालावी असे देखील न्यायालयाने म्हटले होते. हा निर्णय कोणत्या एका विशिष्ट धर्माच्याविरोधात नसून फटाक्यांपासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here