मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग यांच्या न्यायदान कक्षामध्ये दि. 14 ऑगस्ट रोजी “मध्यस्थ जागृती” कार्यक्रमाचे आयोजन

432

मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग यांच्या न्यायदान कक्षामध्ये
दि. 14 ऑगस्ट रोजी “मध्यस्थ जागृती” कार्यक्रमाचे आयोजन

अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका):- मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग यांच्या न्यायदान कक्षामध्ये शनिवार, दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता “मध्यस्थ जागृती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती विभा इंगळे या असणार आहेत तर जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी तसेच अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रवीण ठाकूर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी हे करणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,अलिबाग श्री. आर. आर. पाटील हे “मध्यस्थी प्रक्रिया” या विषयावर प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी दिली आहे.

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here