महा 24 News दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

महा 24 News

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

▪️अनिल देशमुख ईडी प्रकरणात नाट्यमय घडामोडी, देशमुख यांचे वकील आणि सीबीआय अधिकारीही अटकेत.. गोपनीय अहवाल फोडल्याचा आरोप. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी सीबीआयच्या ताब्यात, 20 मिनिटांच्या चौकशीनंतर सुटका.

▪️खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला.. मराठा समाजाचे प्रश्न राष्ट्रपतींसमोर मांडले, संभाजीराजेंची माहिती.

▪️शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. शाळा दिवाळीपूर्वी सुरु करणार की दिवाळीनंतर याचा निर्णय दोन दिवसात : बच्चू कडू▪️अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ आणि सामान्यांसाठी महागाई, हाच भाजपचा ‘विकास’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल.. राहुल गांधींनी सांगितला GDP चा अर्थ, म्हणाले.. गॅसच्या किमतीत 116 टक्के वाढ.

▪️बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; कोणावरही संशय नसल्याचं कुटुंबियांचं स्पष्टीकरण.

▪️कोरोनाचं संकट अधिक गडद; काल एकाच दिवसात 47,092 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. राज्यात बुधवारी 4, 456 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 183 रुग्णांचा मृत्यू..

▪️11वी प्रवेशाच्या दुस-या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास एकच दिवस दिल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये असंतोष. शिक्षण विभागाने पसंतीक्रम नोंदविण्यास मुदतवाढ देण्याची मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here