माहेरावरून पैसे आणि किंमती वस्तू आणण्यासाठी विवाहितेला फिनेल पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न

356
  • पती, सासू-सासर्‍याविरूध्द गुन्हा
  • फिनेल पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न
  • अहमदनगर माहेरावरून पैसे आणि किंमती वस्तू आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. विवाहितेचे हात-पाय धरून फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील जयभीम हौसिंग सोसायटीत घडला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • स्नेहा दिनेश मेढे (वय 25 रा. रेल्वेस्टेशनजवळ, अहमदनगर) असे विवाहितेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दिनेश गौतम मेढे, सासू अनिता गौतम मेढे, सासरे गौतम मेढे (सर्व रा. जयभीम हौसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशन, अहमदनगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहा यांचा दिनेश मेढे यांच्याशी विवाह झाला होता. माहेरावरून पैसे आणि किंमती वस्तू आणण्यासाठी सासरी छळ सुरू करण्यात आला. स्नेहा यांचे शुक्रवारी सकाळी सासू अनिता यांनी दोन्ही हात धरले तर सासरे गौतम यांनी पाय धरले.
  • पतीने बळजबरीने फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here